32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर,समृध्दी महामार्गावरही पाणी

बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर,समृध्दी महामार्गावरही पाणी

0
109

blank

बुलढाणा : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील पाच लाख शेतकरी आणि लाखो रहिवासी यांना दमदार पावसाची अपेक्षा होती. काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार पावसाने हजेरी लावली. आज गुरुवारी प्रामुख्याने मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. यामुळे या तालुक्यातील अनेक नदी, नाले एक झाले असून झालेल्या पेरण्यांचे नुकसान झाले आहे. तसेंच दैनंदिन जीवन, व्यवहार विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. मेहकर तालुक्यात घराची भिंत कोसळली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.blank
आज गुरुवारी सकाळी ८. ३० वाजता संपलेल्या गट २४ तासात तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.बुलढाणा तालुक्यात ७३ मिमी, चिखली मध्ये ७० तर लोणार तालुक्यात ८२  मिमी पावसाची नोंद झाली  सिंदखेड राजा तालुक्यात ५०मिमी तर देऊळगाव राजा तालुक्यात ३२मिमी पावसाची नोंद झाली. आज मेहकर व लोणार तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातल्याचे दिसून आले. मेहकर तालुक्यातील पांगर खेड येथील घनश्याम सुर्वे यांच्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली. यामुळे सुदैवाने १५ टिनपत्रे,आणि घरगुती साहित्याची हानी झाली. मेहकर आणि लोणार तालुक्यात काल सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.blank

blank