40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ वेदांत आयटीआयच्या वतीने नीट परीक्षेत सुयश प्राप्त करणाऱ्या सुधा गिरीपुंजेचा सत्कार

वेदांत आयटीआयच्या वतीने नीट परीक्षेत सुयश प्राप्त करणाऱ्या सुधा गिरीपुंजेचा सत्कार

0
31

blank

तिरोडा-नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात सहकार नगर तिरोडा येथील सुधा गिरीपुंजे या विद्यार्थिनीने 720 पैकी 558 गुण प्राप्त करून ऑल इंडिया ओबीसी 3729 वी रँक प्राप्त करून यश संपादन केले. त्याबद्दल वेदांत आयटीआयच्या वतीने वेदांत आयटीआयचे संस्थापक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वाय.टी.कटरे यांचे हस्ते माजी ग्रामपंचायत सदस्या सीमा कटरे ,प्राचार्य डी.आर.गिरीपुंजे, डॉ.कल्प गिरीपुंजे, प्राचार्य पी.एच.पारधी,उपप्राचार्य डी.एम.भेलावे ,माजी प्राचार्य के.जी.येडे,निर्देशक ए.टी.येडे, ए.एस.वासनिक ,अनिकेत पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

blank