33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना त्वरित भरपाई द्या;उद्धवसेनेची मागणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना त्वरित भरपाई द्या;उद्धवसेनेची मागणी

0
42

blank

गोंदिया- जिल्ह्यात ९ ते ११ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांना त्वरित थेट अनुदान देण्यात यावे, अशी मागणी उद्धवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी वरुण सहारे यांना निवेदन सोमवारी (दि. १४) देण्यात आले. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे झालेले नुकसान, घरांची पडझड, जनावरांची हानी, रोजगार बुडालेल्या मजुरांची मजुरी तसेच
यावेळी दिलेल्या निवेदनात बोनस आणि धानाचे थकीत चुकारे त्वरित देण्यात यावे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रमुख शैलेष जायस्वाल यांनी दिला आहे.शिष्टमंडळात विधानसभा प्रमुख संजय पवार, शहरप्रमुख प्रकाश उईके, दलित सेना तालुकाप्रमुख सुरेश ढवरे, शहरप्रमुख (दलित सेना) गौरी शहारे, बूथप्रमुख दामू नेवारे, यादव कुंभरे, रमेश लांडेकर तसेच विविध सेवा सहकारी संस्थांचे संचालक लांजेवार, शिवसैनिकांचा समावेश होता.

blank