34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ तक्रार निवारण दिनानिमित्त तहसीलदारांनी केली आधार सेवा केंद्राची पाहणी

तक्रार निवारण दिनानिमित्त तहसीलदारांनी केली आधार सेवा केंद्राची पाहणी

0
46

blank

सेवांच्या गुणवत्तेची घेतली माहिती, सुधारणा सुचवण्याचे निर्देश
वाशिम,दि.१६ जुलै:रिसोड तहसील कार्यालयात आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी तहसील कार्यालयातील आधार सेवा केंद्राची आज दि.१६ जुलै रोजी अचानक पाहणी केली.यावेळी त्यांनी आधार नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेची माहिती घेतली. केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, प्रतीक्षा वेळ, तांत्रिक सुविधा व कर्मचाऱ्यांचे वर्तन या सर्व बाबींचा बारकाईने आढावा घेतला.
तहसीलदार तेजनकर यांनी सेवा केंद्राच्या जबाबदार कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत, नागरिकांना अडचणी जाणवू नयेत यासाठी आवश्यक त्या सुधारणा तत्काळ करण्याचे निर्देश दिले. आधार केंद्र हे नागरिकांसाठी महत्त्वाचे दालन आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुलभ, सुसंस्कृत आणि जलद सेवा मिळाली पाहिजे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
वयस्कर नागरीकांच्या बायोमेट्रिक्स संदर्भात तहसीलदारांनी विशेष दखल वयोवृध्द व ज्येष्ठ नागरिकांचे आधार विषयक समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही यावेळी दिले.
या पाहणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी तसेच बैठकीच्या व्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचे आढळून आले. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच त्यांनी प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल व सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळेल, हेच प्रशासनाचे प्रथम कर्तव्य असल्याचे यावेळी सांगितले.
या भेटीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक हालचाल जाणवली असून, नागरिकांना उत्तम सेवा मिळावी यासाठी प्रशासन सजग असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

blank