41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ शासन 150 दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा आढावा

शासन 150 दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा आढावा

0
38

blank

गोंदिया –जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान या दोन्ही विभागांचा 150 दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचा आढावा घेतला.सद्य स्थितीत राज्य शासनाच्या गतिमान महाराष्ट्र अंतर्गत शासनाच्या 150 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत ई-गव्हर्नन्स सुधारणा सुरु असुन  शासकीय कार्यालयांमध्ये ई-प्रशासन सुधारणा बाबत अंमलबजावणी सुरु आहे.त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी आपल्या विभागाचा आढावा ह्याप्रसंगी घेतला.

सदर आढावा बैठकीत आरोग्य विभागाचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अरविंद कुमार वाघमारे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद काळे,कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी शाम लिचडे,जिल्हा आय.ई.सी.अधिकारी प्रशांत खरात तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे,जिल्हा लेखा व्यवस्थापक संकेत मोरघरे यांचे सह दोन्ही विभागाचे कार्यक्रम समन्वयक व कर्मचारी उपस्थित होते.

 यावेळी डॉ.गोल्हार यांनी राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी 150 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे.यामध्ये सर्व विभाग व क्षेत्रिय कार्यालयाने आगामी 150 दिवसांमध्ये त्यांचे कार्यालय ही प्रशासनाच्या दृष्टीने सर्वकष सुधारणा करून  नागरिकांना सोयीचे कसे होईल यासाठी विशेष सुविधा पुरवणे अपेक्षित असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांचे जीवन सहजतेने पार पाडण्यास यामुळे मदत होणार आहे.लाभार्थी शासनाकडे विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करण्यासाठी विविध प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी संवाद साधत असतात. ई-गव्हर्नन्स मुळे अशा सेवा नागरिकांना पोर्टलवर उपलब्ध झाल्या तर त्यासाठी विशेष वेळ काढून कार्यालयात येणे किंवा संबंधित कार अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे इत्यादी बाबी टाळल्या जाऊ शकणार आहे.म्हणुन सर्व कर्मचारी यांनी आपल्याकडे येणार्या सर्व फाईल्सचा निपटारा करणे आवश्यक आहे. तसेच कुठलेही प्रस्ताव प्रलंबित न ठेवता आवश्यक कार्यवाही करुन वरिष्ठ कार्यालयात ई- ऑफीस ने पाठविणे आवश्यक असल्याचे सांगितले.  

शासनाच्या 150 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत ई-गव्हर्नन्स सुधारणा मुळे शासन ते नागरिक यामधील संवाद ,शासनामध्ये अंतर्गत सुसंवाद ,शासन संकेतस्थळ,आपले सरकार, ई-ऑफिस व डॅशबोर्ड वेब एप्लीकेशन अद्यावत राहण्यास मदत मिळणार आहे.

blank