35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ राज्यात सर्वत्र दि.३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान चळवळ

राज्यात सर्वत्र दि.३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान चळवळ

0
52

blank

रुग्णांना नवजीवन देण्यासाठी राज्यभरात ‘अवयवदान’ चळवळ म्हणून राबवा

दि.१५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनी होणार्या कार्यक्रमात अवयव दात्यांचा होणार सत्कार

– प्रकाश आबिटकरआरोग्य मंत्रीसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

 गोंदिया  महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी येत्या ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबवावीअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुंबई येथे दि. 29 जुलै रोजी आयोजित राज्यस्तरीय बैठकीत दिले.

राज्यात दि. ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्यात ‘अवयवदान पंधरवडा’ म्हणून राबविण्यात येणार असून,यासाठी राज्यस्तरीय नियोजन बैठक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.29 जुलै आयोजित करण्यात आली होती.यावेळी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.कादंबरी बलकवडेकेईएम रुग्णालयाचे डॉ.आकाश शुक्लावैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मार्गदर्शन करताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यात राबविण्यात येत असलेल्या अवयवदान उपक्रमाचा आढावा घेतला व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी त्यांना नवजीवन मिळावेयासाठी अवयवदान ही एक चळवळ म्हणून राबवावी व व्यापक प्रमाणावर जनजागृती करावीअसे निर्देश दिले.अवयवदानाबाबत सकारात्मकरित्या मतपरिवर्तन करून अवयवदानाविषयी असणारी भीती कमी करावीतसेच प्रभावीपणे पद्धतीने काम करून सकारात्मक परिणाम दिसतील अशी विश्वासार्ह मोहीम दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवावीअशा सूचना दिल्या.त्याचप्रमाणेदि.१५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात अवयव दात्यांचा सत्कार करावा व मोहिमेला सकारात्मकरित्या गती द्यावीअशा सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

राज्यातील मोहिमेचा नियमित आढावा घेऊन अवयवदानासाठी व्यापक जनजागृती करावीलोकांमध्ये असणारी भीती कमी करून सामाजिक दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच अवयवदानासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थाविभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या यांनी व्यापकपणे काम करून महाराष्ट्राला अवयवादामध्ये अग्रेसर ठेवावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले कीअवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून अधिकाधिक रुग्णांना अवयव मिळावेतयासाठी पंधरवड्यात प्रभावी कामकाज व्हावेअसे आवाहन त्यांनी केले.

राज्यात ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत अवयवदान पंधरवडा म्हणून राबविण्यात येत असून विभागीय प्रत्यारोपण समिती मार्फत विभागनिहाय जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.ज्या कुटुंबीयांनी सामाजिक भान जागृत ठेवून मेंदू मृत झालेल्या रुग्णांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला होतात्यांचा तसेच अवयव दानामुळे नवजीवन प्राप्त झालेल्या व्यक्तींचा स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागवैद्यकीय शिक्षण विभाग यांचे अधिकारी तसेच रुग्णालय सहसंचालक डॉ.सुनिता गोल्हाईत,केईएम रुग्णालयाचे डॉ.आकाश शुक्लाउपसंचालकडॉ.कैलास बाविस्करसहायक संचालक डॉ.फडणीस व दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय उपसंचालक व क्षेत्रीय अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अधिकारी उपस्थित होते.

blank