34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत धादरी येथे क्रांतीदिन उत्साहात

ग्रामपंचायत धादरी येथे क्रांतीदिन उत्साहात

0
125

blank

चित्रा कापसे/तिरोडा,दि.०९-तालुक्यातील धादरी/उमरी ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीदिनानिमीत्त शहीद संजय पटले यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले.
धादरी/उमरी गावात असलेले सर्व महापुरुष व शहीद संजय पटले यांच्या पुतळ्यांना दीप्रज्वलन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले व आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर ग्राम पंचायत कार्यालय धादरी/उमरी येथे कारगिल युध्दात शहीद झालेले संजय पटले यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून पुष्पमाला अर्पण करून भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच अजितकुमार ठवरे,उपसरपंच व कृषि उत्पन्नबाजार समिती तिरोडाचे संचालक मनिषताई पटले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष घनश्याम राहांगडले, ग्रामपंचायत चे सदस्य सुनिल पटले, सामाजिक कार्यकर्ता पवन पटले, संतोष लिल्हारे, सूरेश पाटिल, आशा सेविका मिनाक्षी पाटिल, परिचर कविदास तुमसरे, व ग्रामवासी उपस्थित होते.

blank