42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे युवा नेते बोपचे यांच्याकडून आदिवासी दिनानिमित्त अल्पोहार वितरण

राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे युवा नेते बोपचे यांच्याकडून आदिवासी दिनानिमित्त अल्पोहार वितरण

0
48

blank

चित्रा कापसे/तिरोडा,दि.०९ःतिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या सहकार्याने शहरातील राणी अवंतीबाई लोधी स्मारकाजवळ जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी रॅलीतील नागरिकांना अल्पोहाराचे वितरण प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

दरवर्षी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना व समाज बांधवांकडून हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने गाव-शहरातील आदिवासी समाज भव्य रॅलीचे आयोजन करतो, ज्यामध्ये विविध कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते.आज तिरोडा येथे निघालेल्या रॅलीचे तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. रॅलीतील सहभागी समाज बांधवांना अभिनंदन करून अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.यावेळी आशिष येरपुडे,विजय बुद्धे, जॉनी सैय्यद,मंगेश गेडाम,टिपू सैय्यद,राजेश गोटफोडे,रंजित बागडे,बॉबी वालदे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank