36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ जागतिक आदिवासी दिन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरा

जागतिक आदिवासी दिन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरा

0
35

blank

गोंदिया,दि.०९ः उत्साह, एकता आणि संस्कृतीचा संगम असा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चांदनी चौक, गोंदिया येथे पार पडला. जननायक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून समाजबांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. खासदार प्रफुल पटेल आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आज शहरात आदिवासी बांधवांची रेली पारंपरिक वादन, जय सेवा ची घोषणाबाजी आणि पारंपरिक पोशाखांसह निघाली होती. चांदनी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला सर्वश्री शिव शर्मा, शहराध्यक्ष नानू मुदलियार, सतिश देशमुख, पूजा अखिलेश सेठ, अजय हलमारे, डॉ माधुरी नासरे, भगत ठकराणी, खालिद पठाण, करण टेकाम, हेमंत पंधरे, हरीराम आसवानी, रवी मुंदडा, पुस्तकला माने, सुचिता चव्हाण, विनीत शहारे, छोटू पंचबुद्धे, राजेश दवे, लखन बहेलिया, रवी रामटेक्कर, योगेश पतेह, हरबक्ष गुरुनानी, योगेश दर्वे, शैलेश वासनिक, नागो बंसोड, अहमद भाई, रौनक ठाकुर, श्रेयश खोब्रागड़े अमन घोड़ीचोर,अनुराग बोरकर यश खोब्रागड़े, अयाक बोरकर, संदेश चौरे,प्रमोद ऊके, कुलदीप नागदेवे , भूषण पाटिल , टीनू खंडारे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकरकर्ता उपस्थित होते.

blank