33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ केशोरी येथे कृषी पद्धतीवर प्रशिक्षण;रानभाजी महोत्सवातून दिली पोषणमूल्यांची माहिती

केशोरी येथे कृषी पद्धतीवर प्रशिक्षण;रानभाजी महोत्सवातून दिली पोषणमूल्यांची माहिती

0
45

blank

केशोरी येथे कृषी पद्धतीवर प्रशिक्षण उमेद महिला व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अर्जुनी मोरगाव,. तालुक्यातील केशोरी येथे रानभाजी महोत्सव तसेच भेंडी उत्तम कृषी पद्धत आणि मिरची उत्तम कृषी पद्धतीवरील शेतकरी प्रशिक्षण मंगळवारी (दि. १२) केले होते. या कार्यक्रमात उमेद येथील महिला व शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच रानभाजी महोत्सवात स्थानिक विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व त्यांचे पोषणमूल्यांची माहिती देण्यात आली.
पारंपरिक पद्धतीने या रानभाज्यांचा आहारात समावेश कसा करावा. त्यांचे संवर्धन व बीजसंकलन तंत्र, तसेच बाजारपेठेत विक्रीद्वारे उत्पन्नवाढीच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही दुर्मिळ रानभाज्यांचे प्रत्यक्ष नमुनेही उपस्थितांना दाखविण्यात आले. ज्यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक अन्न संस्कृतीचे जतन व प्रसाराला प्रोत्साहन मिळाले. या महोत्सवात कृषई संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. उषा डोंगरवार यांनी निर्यातक्षम भेंडी लागवडीबाबत मार्गदर्शन केले. सतीश गिरसावडे यांनी भेंडी व मिरची पीक, खत व पाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ.प्रशांत उंबरकर यांनी भेंडी व मिरची पिकातील कीड व रोग नियंत्रणाबाबत, दिगंबर साबळे यांनी भेंडी व मिरची प्रक्रिया, निर्यातीतील संधी व गुणवत्तेवर मार्गदर्शन केले. यावेळी अनेक महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

ओमप्रकाश सुखदिवे यांनी लिंग समानता व सामाजिक समावेशाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमालासरपंच नंकुमार गहाने, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट,फुलचंद बागडेरिया,श्रीमती सुलक्षणा पाटोळे तालुका कृषी अधिकारी,रेशिम नेवारे तालुका अभियान व्यवस्थापक,रिता दडमल BM-IBCB,प्रतिभा शेंडे अध्यक्ष प्रभाग संघ केशोरी,दिपक निमकर BM-MIS डोमेस कोरडे लेखा व प्रशासन सहाय्यक, कु. सीमा वालदे प्रभाग समन्वयक केशोरी, पुष्पा कराडे प्रभाग संघ व्यवस्थापक , विलास बोरकर कृषी व्यवस्थापक तसेच सर्व अर्जुनी मोरगाव येथील प्रभाग समन्वयक, उमेद कर्मचारी व कॅडर आणि शेतकरी उपस्थित होते .

blank