
गोंदिया, दि.19 : “अवयवदान म्हणजेच जीवनदान” या जनजागृतीसाठी राज्य सरकारतर्फे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या सूचनेनुसार गोंदिया जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनी एक विशेष उपक्रम राबवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते अवयवदात्यांचा सत्कार करून समाजासमोर प्रेरणादायी संदेश ठेवण्यात आला.हा सत्कार समारंभ जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, गोंदिया यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद व आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सन्मानीत अवयवदाता पुढीलप्रमाणे : मीना राजकमल रामसार (गोंदिया), अंजु दिलीप पाठक (वाराशिवनी,बालाघाट), लक्ष्मी रमन लारोकर (सिव्हिल लाईन,गोंदिया), चत्रुलाल हसमतराय लिलवानी (सिंधी कॉलनी,गोंदिया), दादादेवी लालचंद बजाज (रामनगर,गोंदिया), हेमा दीपक कुंदनानी (श्रीनगर,गोंदिया), भुरकन यशवंत कटरे (कमरगाव,गोंदिया), भगवंती किशनचंद आहुजा (सिंधी कॉलनी,गोंदिया) यांचा समावेश होता.
यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी अवयवदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “एक अवयवदाता अनेक कुटुंबांना नवे आयुष्य देवू शकतो. समाजाने या कार्यात सहभागी व्हावे, हीच खरी देशसेवा आहे” असे ते म्हणाले. यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांनीही नागरिकांना अवयवदानाची शपथ घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




