27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home राजकीय गोरेगांव शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

गोरेगांव शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
185

गोरेगाव,दि.२६ःगोरेगांव शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खासदार प्रफुल पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय गोंदिया येथे प्रवेश केला.

खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासवादी धोरणांवर विश्वास ठेवून राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा वापरून गोरेगाव शहरातील कैलास वाघाडे, विलास वाघाडे,देवेंद्र वाघाडे,राजेश येल्ले,रामलाल सोनवाने, भारत मौजे,मारोती उके, रोहित उके,तेजराम मौजे,सुधीर मेश्राम,छगन मेश्राम,विलास सोनवाने,शिवराम वाघाडे, श्री छबीलाल वाघाडे,मोतनलाल मेश्राम यांनी पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होवून आगामी निवडणुकांमध्ये याचा निश्चित फायदा होणार आहे.याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, खरेदी विक्री उपाध्यक्ष रामूभाऊ हरिणखेडे, शहर अध्यक्ष कृष्णकुमार बिसेन, युवक शहर अध्यक्ष प्रमोद जैन, शहर प्रवक्ता मनीष धमगाये सहित अन्य उपस्थित होते.