31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ जि.प. उच्च प्राथमिक शाळा कवलेवाडा येथे तान्हा पोळा निमित्त विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वितरण

जि.प. उच्च प्राथमिक शाळा कवलेवाडा येथे तान्हा पोळा निमित्त विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वितरण

0
120

तिरोडा —आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना आपले हिंदी संस्कृतीचे सण कशा पद्धतीने साजरे करतात याविषयी महिति व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा याकरिता जि प किरणभाऊ पारधी यांच्या यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर एक वस्तू पुरस्कार म्हणून वितरित करण्यात आली.

प्रमुख अतिथी म्हणून सरपंच इंदुबाई पारधी ,योगराज टेंभरे, डॉ.दिलीप ढाले,जितेश बोदले,बबलदास ठाकरे,संजय पारधी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते
जि. प. शाळा कवलेवाडा येथे तान्हा पोळयाचे आयोजन करण्यात आले होते.जि.प.सदस्य श्री किरण भाऊ पारधी यांनी वर्ग ०१ ते ०७ वर्गाच्या विद्यार्थी साठी पाण्याची बॉटल,बबलदास ठाकरे यांच्या हस्ते ट्रॉफी व चॉकलेट,संजय पारधी यांच्या हस्ते वितरीत करण्यात करण्यात आले,कार्यक्रमाचे संचालन बबलदास पारधी,आभार संजय पारधी यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.