37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ धापेवाडा परिसरात वीज पडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

धापेवाडा परिसरात वीज पडून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

0
91

blank

नागपूर ::जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातंर्गत येत असलेल्या धापेवाडा,दि.27ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करत असताना अचानक वीज पडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यात वंदू प्रकाश पाटील, त्यांच्या मुलगा ओम प्रकाश पाटील आणि निर्मला रामचंद्र पराते यांचा समावेश आहे. ही घटना त्यांच्या कुटुंबासाठी प्रचंड धक्कादायक ठरली आहे, कारण आता या कुटुंबात फक्त 16 वर्षांची मुलगी राहिलेली आहे.

घटना घडताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे,अनुग्रह तिडके,सुमित गमे व जितेंद्र कोल्हे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका उपलब्ध करून मृतदेह सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परिसरातील लोक या दुर्दैवी घटनेने भावविभोर आहेत. स्थानिक प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकरी व नागरिकांना पावसाळ्यात वीजेच्या धोक्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

blank