38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गणेशोत्सव दरम्यान मंडळांनी आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम हाती घ्यावे-dho डॉ.अभिजीत गोल्हार

गणेशोत्सव दरम्यान मंडळांनी आरोग्य विषयक जनजागृती उपक्रम हाती घ्यावे-dho डॉ.अभिजीत गोल्हार

0
37

blank

गोंदिया,दि.२८ः-जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट पासुन गणेशोत्सव सुरु झालेला आहे. गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवाच्या कालावधीत विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतले जातात.सामाजिक उपक्रमांसोबत विविध आरोग्य विषयक जनजागृती उपक्रमांवर भर देण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी जिल्ह्यातील गणेश मंडळाना केले आहे.गणेशोत्सवानिमित्त अवयवदान जनजागृती मोहिमही राबविण्यात यावी.अवयवदानाचे व कॅडेव्हेअर अवस्थेमधील देहदानाचे महत्त्व सामान्यांना पटावे यासाठी ही जनजागृती राबवावी.

तसेच गणेश मंडळ सभासद,नागरिक यांच्या समन्वयाने रक्तदान शिबीरही घेण्यात यावे.रक्ताची तूट लक्षात घेऊन या शिबिराच्या माध्यमातून गोळा झालेले रक्त जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढ्यांना वितरित करण्यात यावे.गावपातळी व शहरातील मंडळांनीही यंदा विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे.नेत्रतपासणीसह कर्णबधिरांसाठी मोफत कानाचे यंत्र देण्याची सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिले तर वयोवृद्ध लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण होणार आहे.तरुण गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने राबवलेल्या विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यासह नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्याचा उपक्रम राबवण्यात यावा.डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या आजारांचा जोर वाढता असल्याने साथीच्या आजारांना अटकाव घालायचा असेल तर काय करायला हवे याची माहिती गणेश सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून दिली जाण्यात यावी.

गणेश मंडळामध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन यावे. घरासाठी, कुटुंबासाठी अहोरात्र खपणाऱ्या महिला स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यासह वैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून समुपदेशन शिबिराचेही आयोजन करण्यात यावे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या असल्याने डासोत्पत्ती स्थानांमध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यात कीटकजन्य आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.कीटकजन्य आजार डेंग्यु, हिवताप, मेंदुज्वर व चिकुनगुनिया आजाराविषयी जनतेमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गणेशोत्सव आयोजक मंडळ स्तरावरून शहर व गाव पातळीवर जनजागृती करण्यात यावी.जेणेकरून शहरी व ग्रामीण भागातील नागरिक उत्सवा दरम्यान गणेश आरती दरम्यान कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी.यामुळे किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यास सहकार्य होणार  असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे.

शहरी भागाच्या गणेशोत्सव मंडळाकडे एलसीडी स्क्रीन उपलब्ध आहे त्या मंडळांनी मधुमेह, रक्तदाब, सिकलसेल ई.विविध आजाराबाबत व्हिडिओ चालवून जनजागृती करण्यात येण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.गणेश मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून ऑडीओ,व्हिडीओ सीडी गणपती मंडपात सुरू ठेवावी, तसेच मंडपात हिवताप,डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करता येईल, याची सविस्तर माहिती असलेला बॅनर लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

blank