25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home रोजगार/व्यापार तिरोडा येथे 3 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

तिरोडा येथे 3 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
37

गोंदिया, दि.28 : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व सी.जे.पटेल महाविद्यालय तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सी.जे.पटेल महाविद्यालय, खैरलांजी रोड, तिरोडा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक/नियोक्ता/प्लेसमेंट एजन्सी सहभागी होणार आहेत.

         इयत्ता 10 वी व 12 वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

        अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील दूरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रा.ना.माटे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केले आहे