गोंदिया,दि.२८ःजिल्ह्यात संघटन वाढ,पक्षाची विचारधारा व कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करण्यासाठी खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या निर्देशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात पक्षाची वाढ करण्यासाठी अमित अवस्थी यांची जिल्हा संघटन सचिव पदावर निवड आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांनी केली.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, प्रेमकुमार जायस्वाल, केतन तूरकर,अनुज जायस्वाल, राजेश कापसे, बिट्टू जायस्वाल, आकाश गडपायले, सुनील पटले, सह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





