23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ बोंडगांवदेवी येथे 72 वर्षापासून”एक गांव एक गणपती”

बोंडगांवदेवी येथे 72 वर्षापासून”एक गांव एक गणपती”

0
44

अर्जुनी-मोर.-तालुक्यातील बोंडगांवदेवी येथे गेल्या 72 वर्षापासून एक गांव एक गणपती ही संकल्पना आजतागायत सुरु आहे. सार्वजनिक बाल गणेश मंडळ बोंडगावदेवी वतीने हा गणेश उत्सव शांततेत साजरा करण्यात येतो.दहा दिवसीय या गणेश उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.शासनातर्फे आयोजीत विवीध स्पर्धात्मक कार्यक्रमात येथील मंडळाने भाग घेत दरवर्षीच विविध पारितोषिक पटकावीले आहे.
यावर्षी 27 ऑगस्ट ला श्री गणेश मंदिर व अभ्यासिका अशा सुसज्ज जागेवर गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली.दररोज दिवसभर विविध उपक्रम व रात्रो सांस्कृतिक व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. 29 ऑगस्ट ला दुपारी वने/ निसर्ग जतन व संवर्धन यावर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन व गावातील प्रमुख ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला दे.मो.मानकर,डाॅ.शामकांत नेवारे,कुशन झोळे,डाॅ.सुरेंद्र खोब्रागडे,डाॅ.कुंदन कुलसुंगे,कैलास घावळे,योगेश बारस्कर, दिलीप बोरकर,दिनेश परशुरामकर, ओमप्रकाश झोळे,ज्ञानेश्वर मेश्राम, नारायण बोरकर,संतोष मेश्राम व अन्य कार्यकर्ते व गावकरी उपस्थीत होते.

blank