गोंदिया-महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक संलग्न )चा रामनगर येथील कामगार भवनात झालेल्या तालुका मेळाव्यात आशांकडून अतिरिक्त कामे करवून घेणे व अश्या अनेक स्थानिक प्रश्नांना तसेच राज्य सरकारच्या स्तरावरील आर्थिक मागण्यांना घेवून आपला लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. तालुका अध्यक्ष पुस्तकला रहांगडाले यांचे अध्यक्षते झालेल्या मेळाव्याचे उदघाटन आयटकचे राज्य सचिव कॉ. मिलिंद गणवीर यांनी केले तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष कॉ. शालूताई कुथे, जिल्हा अध्यक्षा वर्षाताई पंचभाई,कार्याध्यक्ष कॉ. रामचंद्र पाटील,आयटक जिल्हा सहसचिव कॉ.करुणा गणवीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुका सचिव उषाताई बारमाटे यांनी तालुक्यातील अहवालाची मांडणी केली.कार्यक्रमाचे संचालन तालुका सहसचिव शिल्पा राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार गीता उके यांनी मानले. विशेष पाहुणे म्हणून आयटकचे जिल्हा कोषाध्यक्ष कॉ. सुरेश रंगारी उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.पुस्तकला रहांगडाले (अध्यक्ष ), रेणुका राऊत (कार्याध्यक्ष ) उषा बारमाटे (सचिव ), शिल्पा राऊत, सविता मेश्राम (उपाध्यक्ष ), रेखा हरिनखेडे, मेथीका साखरे (सहसचिव ), जयश्री तूरकर (कोषाध्यक्ष )सह 33 सभासदांचा समावेश आहे.





