28.9 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home शैक्षणिक उत्कृष्ट विद्यापीठ शिक्षकांचा होणार सत्कार

उत्कृष्ट विद्यापीठ शिक्षकांचा होणार सत्कार

0
46
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षक दिन समारंभ शुक्रवारी
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांचा पुरस्कार घेऊन सत्कार केल्या जाणार आहे. विद्यापीठाचा शिक्षक दिन समारंभ अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात उकृष्ट शिक्षकांना पुरस्कृत केले जाणार आहे.
शिक्षक दिन समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूरचे माजी संचालक श्री. सतीश वटे तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची उपस्थिती राहणार आहे. या समारंभात उत्कृष्ट प्राचार्य म्हणून शहरी भागातून इंद्रप्रस्थ न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वर्धा येथील प्राचार्य डॉ. आशिष बबनराव ससनकर तर ग्रामीण भागातून जगत आर्टस्, कॉमर्स अँड इंदिराबेन पटेल सायन्स कॉलेज गोरेगाव गोंदिया येथील प्राचार्य डॉ. निळकंठ यादवराव लंजे यांना पुरस्कृत केले जाणार आहे. उत्कृष्ट शिक्षक म्हणून विद्यापीठ शैक्षणिक विभागातून इतिहास विभागातील विभाग प्रमुख डॉ. शामराव इंदरसे कोरेटी, संलग्नित महाविद्यालयातून प्रियदर्शनी जे.एल. कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर येथील डॉ. शिल्पा अभिजीत देशपांडे यांना सन्मानित केले जाणार आहे. उत्कृष्ट संशोधक म्हणून विद्यापीठ शैक्षणिक विभागातील पदव्युत्तर रसायनशस्त्र विभागातील डॉ. विजय एम. तांगडे तर संलग्नित महाविद्यालयातून डॉ. आर.जी. भोयर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (विद्याभारती) सेलू येथील डॉ. आशिष दिलीपराव टिपले यांना सन्मानित केले जाणार आहे. उत्कृष्ट लेखक म्हणून अंत्योदय महाविद्यालय देवग्राम येथील डॉ. राजू घनश्याम श्रीरामे तर उत्कृष्ट समाजकार्य पुरस्काराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथील डॉ. विजयता एम. विटणकर यांना सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी केले आहे.

blank