28.9 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home शैक्षणिक ओबीसी वसतिगृह प्रवेश प्रकिया रखडली,राज्यसरकारचा ओबीसीबाबत दुजाभाव

ओबीसी वसतिगृह प्रवेश प्रकिया रखडली,राज्यसरकारचा ओबीसीबाबत दुजाभाव

0
4

गोंदिया- २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजतवाजत सुरु केलेल्या राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी २०२६-२७ मध्ये शैक्षणिक सत्र सुरु होऊनही राज्यसरकारने अद्यापही प्रवेश प्रकिया सुरु न केल्याने सरकारच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.मे महिन्यात निकाल लागून इतर प्रवर्गीताली विद्यार्थ्याकरीता वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु होऊन पुर्णत्वाकडे आली आहे.मात्र ओबीसी मुला मुलींच्या वसतिगृहाबाबत राज्यसरकारची भुमिका दुजाभाव करणारी दिसून येत आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ७२ शासकीय वसतिगृहे (प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी १ आणि मुलींसाठी १) मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ५४ वसतिगृहे (२६ मुलांची आणि २८ मुलींची) प्रत्यक्ष सुरू झाली असून उर्वरित १८ वसतिगृहे अद्यापही राज्यसरकार दोन वर्षापासून सुरु करु शकलेले नाही.शैक्षणिक सत्र सुरु झाल्याने अनेक ओबीसी मुला मुलींना वसतिगृह प्रवेेश प्रकिया सुरु न झाल्यामुळे खासगी खोल्या भाड्याने घेऊन राहण्याची वेळ आली आहे.ओबीसी संघटना सातत्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधत असतानाही ओबीसींचा डीएनए असल्याचे भाजप महायुतीचे सरकार मात्र ओबीसींंचे निर्णय घेतांना टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते.

राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी प्रवेश अर्ज मागवण्याबाबत अद्यापही वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही.

शासनामार्फत सन २०२५-२६ करिता राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना चालवल्या जातात.राज्यात सध्या ५६ मुला-मुलींचे ओबीसी वसतिगृह सुरू आहेत.ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना भाड्याच्या घरी राहण्यासह इतर शैक्षणिक खर्च दिला जातो.मात्र या योजनेकरीताही अद्याप अर्ज प्रकिया सुरु केलेली नाही.वसतिगृह आणि आधार या दोन्ही योजनांसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याकडे ओबीसी विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

विभागनिहाय ओबीसी, व्हीजेएनटी मुला-मुलींच्या वसतिगृहांची संख्या (मंजूर ७२ पैकी)

विभाग (Division) समाविष्ट जिल्हे मुलांची वसतिगृहे मुलींची वसतिगृहे एकूण मंजूर वसतिगृहे
नागपूर (Nagpur) ६ जिल्हे (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली) १२
अमरावती (Amravati) ५ जिल्हे (अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ) १०
छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) ८ जिल्हे (छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव) १६
नाशिक (Nashik) ५ जिल्हे (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर) १०
पुणे (Pune) ५ जिल्हे (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) १०
कोकण (Konkan) ७ जिल्हे (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) १४
एकूण (Total) ३६ जिल्हे ३६ ३६ ७२

राज्यसरकारकडे व इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे वसतिगृह सुरु करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरु असून मंत्रालयपातळीवरुन निर्णय होताच आॅनलाईन अर्ज मागविण्यास सुरवात करण्यात येईल- विजय वाकुडकर उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण नागपूर विभाग

blank