
आमगाव,दि.०४ःसकल ओबीसी समाज आमगावच्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन तहसिलदार यांच्या मार्फेत पाठविण्यात आले.
निवेदनात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देवू नये अन्यथा येणाऱ्या काळात विराट मोर्चा काढुन रस्ते जाम करू असे संकेत महाराष्ट्र शासनाला सर्व ओबीसी समाजांने निवेदनातून दिले आहे.निवेदन देतेवेळी प्रामुख्याने डाॅ.गुरूदास येडेवार, प्रभाकर दोनोडे,सावन कटरे,तिरथ येटरे,संजय बहेकार,भुमेश शेंडे,बालू वंजारी,हिमालय येळे,धिरज ठाकरे, चंद्रकुमार बहेकार, बालू भाऊ गायधने,ओमप्रकाश लांजेवार, विशाल रहांगडाले, महेश उके, जगदिश चूटे,देवकांत बहेकार आदी शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते.





