
गोंदिया : तिसरे वैदर्भीय लेखिका संमेलन ५ व ६ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी आदिवासी समाजाच्या ज्येष्ठ लेखिका उषाकिरण आत्राम यांची निवड करण्यात आली आहे, असे माय मराठी नक्षत्राच्या अध्यक्ष व संमेलनाच्या संयोजिका प्रा. विजया मारोतकर यांनी कळविले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून मनीषा यमसनवार उपस्थित होत्या. दोन दिवसीय संमेलनात ५ चर्चासत्रात, कविसंमेलन, मुलाखत, कथा कथन व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.





