
अर्जुनी मोरगाव :जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या वतीने वडील स्व.चत्रूभाऊ भेंडारकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त( ता. 25) तालुक्यातील इंजोरी येथे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला, यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल आवर्जून सत्कार करण्यात आला.
यावेळी आवर्जून उपस्थित असलेले अमररत्न तवाडे महाराज,माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे व इतरही मान्यवर मंडळींनी स्वर्गीय चत्रुभाऊ भेंडारकर यांच्या सामाजिक,राजकीय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेडारकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल स्तुती करत शुभेच्छा दिल्या.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सीमा हांडगे, संध्या मते, नीतू पठाण, भारती भेडारकर,सुनंदा कांबळे, भारती शेंडे, सविता घोरमारे आणि चिंतामण कांबळे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा उपक्रम समाजातील इतरांना प्रेरणादायी असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे,हीच खरी आपल्या पूर्वजांना आदरांजली आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन गौरविण्यात आल्याबद्दल शिक्षक वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.





