23.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ “पतीने निभावला पतीधर्म” — पत्नीचे प्राण वाचविण्यासाठी केले रक्तदान

“पतीने निभावला पतीधर्म” — पत्नीचे प्राण वाचविण्यासाठी केले रक्तदान

0
36

गोंदिया,दि.०१ : येथील पांजरा कामठा निवासी अमृता भूमेश्वर शेंदरे यांना प्रसूतीसाठी गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रक्ताची कमतरता भासल्याने डॉक्टरांनी तातडीने रक्त चढविण्याची गरज व्यक्त केली.यावेळी त्यांच्या पतीने, भूमेश्वर शेंदरे यांनी निस्वार्थ भावनेतून पुढे येत स्वतः रक्तदान करून पत्नीचे प्राण वाचविले आणि खरी अर्थाने “पतीधर्म” निभावला.

या उल्लेखनीय कार्याबद्दल गंगाबाई ब्लड बँक येथे देवचंद नागपरे, रक्तमित्र विनोद (गुड्डू) चांदवानी, डॉ. लक्ष्मीकांत हुईते, टेक्निशियन अमित मून, खुशी जामभूधपाले, शीतल ठाकरे आणि शुभम मेश्राम यांच्या हस्ते भूमेश्वर शेंदरे यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचे सांगत, गरज पडल्यास समाजातील प्रत्येकाने पुढे येण्याचे आवाहन केले.