तिरोडा,दि.०३ःदसऱ्याच्या पवित्र सणाचे महत्त्व विशद केले. ‘अन्यायावर न्यायाचा आणि असत्यावर सत्याचा विजय’ हे दसऱ्याचे मूळ तत्त्वज्ञान त्यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी भगवान श्रीरामाच्या आदर्शांवर चालण्याचे आणि समाजात बंधुभाव व एकोपा टिकवण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य जगदिश बावनथडे यांनी केले.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुकळी, मेंढा, ईंदिरानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रावण दहन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालू) बावनथडे उपस्थित होते.यावेळी खुमेंद्र रहांगडाले युवा तालुका अध्यक्ष, सरपंच सुनील मेश्राम, उप सरपंच संदिप कुर्वे, उमेश पटले भाजपा कार्यकर्ता,राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन हर्षवर्धन मेश्राम व आभार प्रदर्शन आशिष बिसेन यांनी केले.ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण गाव परिक्रमा केली, ज्यामुळे सण-उत्सवाचा उत्साह अधिक वाढला.





