चित्रा कापसे/तिरोडा,दि.०३-स्थानिक शहीद मिश्रा विद्यालय तिरोडा येथे वृक्षवेल राज्यस्तरीय साहित्य मंच महाराष्ट्र समूहाचे राज्यस्तरीय पहिले कवी सम्मेलन रविवार ५ आँक्टोंबरला संपन्न होत आहे. कवी सम्मेलनाचे अध्यक्ष भारत सातपुते आहेत तर उद्घाटक म्हणून शैलेंद्र लेंडे हे उपस्थित राहतील.पुस्तक प्रकाशन,सन्मानपत्र व सत्कारमूर्ती वितरण सोहळ्याचे अध्यक्ष आमदार विजयभाऊ रहांगडाले व उद्घाटक न.प.माजी सभापती अशोक असाटी ,सहउद्घाटक बाजार समितीचे सभापती जितेंद्र रहांगडाले सभापती,संचालक रामसागर धावडे,प्रा.संजीव कोलते,प्राचार्य निकेशकुमार मिश्रा,डी.आर.गिरिपुंजे,ॲड अशोक मलेवार,किशोरकुमार मलेवार , संजय येरने, नरेंद्र पोतदार,ॲड देवेंद्र चौधरी,सीमा भाजीपाले ,कमल कापसे प्राचार्य,कैलास व्यास, प्रा.वसंत गायकवाड,उपेंद्र रोहनकर, डॉ चंद्रकांत लेनगुरे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.





