25.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ जनतेच्या समन्वयातुन शासन,प्रशासन अधिक बळकट करु:- आम.राजकुमार बडोले

जनतेच्या समन्वयातुन शासन,प्रशासन अधिक बळकट करु:- आम.राजकुमार बडोले

0
30

अर्जुनी-मोर.– जनता हेच खरे आपले मायबाप आहेत.त्यांचे आशीर्वादानेच आपन मोठ्या पदावर जात असतो.त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जावु नये असे काम आपन सुरु केले आहे.जनतेमधे जावुन त्यांची गा-हाणी,अडीअडचणी व गावागावातील विकास कसा साधता येईल या दृष्टिकोनातून अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्रात महत्वाकांक्षी गांव संवाद दौरा आपन सुरु केला आहे.या दरम्यान स्थानीक नागरीकांशी थेट संवाध साधत गावपातळीवरील विविध प्रश्न समस्या, आणी विकास विषयक मुद्यावर सविस्तर चर्चा करुन समस्याचे तात्काळ निराकरणासाठी संबधीत अधिकारी वर्गांना आवश्यक त्या सुचना करुन जनतेच्या सहभागातुन प्रशासन अधिक परिनामकारकपणे कार्य करु शकते या विश्वासाने गाव संवाद दौरा सुरु केल्याचे प्रतिपादन आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी केले आहे.

अर्जुनी-मोर तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम परसोडी/रय्यत, झाशीनगर, येरंडी/दर्रे, प्रतापगड या गावांमध्ये ता.4 आक्टोंबर रोजी गाव संवाद दौरा पार पडला.त्याप्रसंगी आमदार बडोले बोलत होते.
गाव दौरा संवाद प्रसंगी नागरीकांनी आपल्या अडी अडचणी व गावातील विकासासंदर्भात आपले मत मांडले.यावेळी महशुल विभागाच्या संबंधाने ज्या तक्रारी मांडण्यात आल्या त्यावर उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, तहशिलदार अनिरुद्ध कांबळे यांनी विवीध तक्रारीचे निराकरण केले.तसेच विविध विभागातील अधिकारी वर्गानीही आपआपल्या विभागातील प्रश्नांवर उत्तरे दिली.तथा प्रशासन अधिक गतीमान करण्याचे आश्वासित केले. या प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा सदस्य यशवंत गणवीर, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई देशमुख, उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, गटविकास अधिकारी पल्लवीताई वाडेकर, तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाथोडे, उपविभागीय अभियंता महावितरण पाटील, उपविभागीय अभियंता समीर बनसोडे, जि.प. उपविभागीय अभियंता किशोर बनसोड, माजी उपसभापती तथा सदस्य होमराज पुस्तोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लोकपाल गहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, लक्ष्मी राईस मिल अध्यक्ष भोजराज रहेले, राजहंस ढोके, व्यंकट खोब्रागडे, सरपंच भोजराम लोगडे, सरपंच दयाराम लंजे, संजय खरवडे, पराग कापगते, सुशीलाताई हलमारे, आशाताई गदवार, रवींद्र नाईक, नमुदेव नागपुरे, शशिकांत ठवरे, सचिन कापगते तसेच अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.