28.5 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे आग प्रतिबंधात्मक प्रशिक्षण संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे आग प्रतिबंधात्मक प्रशिक्षण संपन्न

0
5

गोरेगाव: आरोग्य संस्था व रुग्णालयांमध्ये अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची सुरक्षितता आणि त्वरित प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा असतो. याच पार्श्वभूमीवर ५ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘आग प्रतिबंधात्मक व आपत्कालीन व्यवस्थापन’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. देव चांदेवार यांच्या संकल्पनेतून हे प्रात्यक्षिक प्रशिक्षण पार पडले.

प्रशिक्षणादरम्यान डॉ. चांदेवार यांनी स्पष्ट केले की, शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे आग लागल्यास ‘रेस’ (RACE) पद्धत (बचाव, सावध करणे, आग रोखणे व विझवणे) आणि अग्निशामक यंत्र चालवण्यासाठी ‘पास’ (PASS) तंत्रज्ञानाची माहिती प्रत्येक कर्मचारी व नागरिकाला असणे गरजेचे आहे.

यावेळी कर्मचाऱ्यांना लाकूड, रसायने व इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे लागणाऱ्या आगीचे विविध प्रकार (Class A, B, C व Electrical Fire) आणि त्यानुसार वापरल्या जाणाऱ्या ABC, CO₂Foam अग्निशामक यंत्रांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच मॉक ड्रिल, आपत्कालीन मार्ग मोकळा ठेवणे आणि प्रेशर गेज तपासणीबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.