25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home शैक्षणिक अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ,विश्वकर्मा लाभार्थी निशा चोपकर यांच्या हस्ते उद्घाटन

अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ,विश्वकर्मा लाभार्थी निशा चोपकर यांच्या हस्ते उद्घाटन

0
36

भंडारा, दि.08 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) भंडारा आणि शासकीय तांत्रिक विद्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग-संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ आज   संपन्न झाला.या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वकर्मा लाभार्थी निशा चोपकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या जयश्री निंबार्ते यांनी केले. या वेळी आयटीआय परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

या उपक्रमाचा शुभारंभ  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने  राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमांतर्गत विविध उद्योगांशी संलग्न अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना कौशल्याधारित रोजगारक्षम बनविण्याचा हेतू आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा येथे फोर व्हीलर सर्विस असिस्टंट, असिस्टंट इलेक्ट्रिशन, असिस्टंट कारपेंटर (वुडन फर्निचर), डिजिटल मित्र, प्लंबर जनरल, मॅन्युअल मेटल ARC वेल्डिंग, CNC टर्निंग ऑपरेटर आणि इलेक्ट्रिशन डोमेस्टिक सोल्युशन हे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) भंडारा येथे LED लाईट रिपेअर टेक्निशियन, डिजिटल मित्र, हॅन्ड एम्ब्रॉयडरी, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, बॅक ऑफिस असोसिएट (फायनान्शियल सर्विसेस), क्राफ्ट बेकर, असिस्टंट इलेक्ट्रिशन, सेल्फ एम्प्लॉइड टेलर, वेब डेव्हलपर आणि इलेक्ट्रिशन डोमेस्टिक सोल्युशन हे अभ्यासक्रम सुरू झाले.

तर शासकीय तांत्रिक विद्यालय भंडारा येथे ऑटोमोटिव्ह वेल्डिंग मशीन असिस्टंट आणि इलेक्ट्रिशन डोमेस्टिक सोल्युशन हे कौशल्यवर्धक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत सुधाकर झळके (सहायक कौशल्य विकास आयुक्त), जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, व्यवसाय शिक्षण अधिकारी व्ही. एम. लाकडे उपस्थित होते. जिल्हा तसेच जिल्हाबाहेरील युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थेने केले.

blank