25.5 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home शैक्षणिक निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रणेची आढावा सभा

निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रणेची आढावा सभा

0
7
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: true; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;

गोंदिया, दि.7 : निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण व सर्व केंद्रप्रमुख यांची जिल्हास्तरीय आढावा सभा बुधवारी श्री लक्ष्मणराव मानकर अध्यापक विद्यालय आमगाव येथे घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी 2027 पर्यंत निपुण होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. सदर सभा ही दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती.

सभेच्या प्रथम सत्रात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या 29 मे 2026 च्या पत्रानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मित्र उपक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आनापान प्रक्रियेची माहिती व्हावी त्याकरिता सर्व केंद्रप्रमुखांची व अधिकाऱ्यांची तीन तासाची आनापान प्रक्रिया समजून घेण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली.

          सदर प्रक्रिया ही विपश्यना केंद्र इगतपुरी यांच्या मार्गदर्शनात धम्म गोंड विपश्यना केंद्र ओझाटोला च्या धम्म सेवकांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले. त्याकरिता विशेष मार्गदर्शक म्हणून नागपूरचे विभागीय विपश्यना मित्र उपक्रम प्रशिक्षक सुरेश भुजाडे, विपिन साखरे, मित्र उपक्रम जिल्हा समन्वयक रोशनी रहांगडाले, धम्म गोंड विपश्यना केंद्र ओझाटोलाचे अध्यक्ष कमलेश कोल्हटकर, धम्म सेवक- हेमंत राऊत, सुनील डोंगरे, अनमोल भालाधरे व त्रिवेणी साखरे उपस्थित होते.

          या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी तणावमुक्त जीवन कसे जगावे, कुशाग्रता व एकाग्रता वाढवून अभ्यासाकडे लक्ष कसे द्यावे, आनापान ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कशी अवलंबवावी तसेच प्रत्येक शाळेत शासनाच्या निर्देशानुसार आनापान प्रक्रिया दररोज दहा मिनिटे घेण्याबाबत सर्व शिक्षण परिषदांमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

           दुसऱ्या सत्रात सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेची आढावा सभा घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची निपुण महाराष्ट्र अभियानात असलेली स्थिती, पीजीआयमध्ये असलेली जिल्ह्याची स्थिती, डॉ.जयंत नारळीकर गणित व विज्ञान समृद्धी कार्यक्रम यामध्ये असलेली केंद्राची स्थिती याबाबत डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी मार्गदर्शन केले.

          खान अकॅडमीमध्ये विद्यार्थी नोंदणी व वापराची स्थिती याबाबत ललित पानतावणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीत असलेले वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.नरेश वैद्य यांनी विद्यान्जली पोर्टल 2.0 यामध्ये शाळांची नोंदणी व साहित्य मागणी याबाबत मार्गदर्शन केले.

          सभेचे संचालन सुनील हरिणखेडे व वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गट समन्वयक सुनील बोपचे यांनी केले. सभेला जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व डायटचे साधनव्यक्ती अनिता ठेंगडी व उर्मिला वैद्य उपस्थित होते.