28.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ ओबीसी मोर्चातील बांधवांसाठी माजी खासदार सुनील मेंढेतर्फे अल्पोपहाराची व्यवस्था

ओबीसी मोर्चातील बांधवांसाठी माजी खासदार सुनील मेंढेतर्फे अल्पोपहाराची व्यवस्था

0
86

भंडारा,दि.११- ओबीसी आरक्षण  वाचविण्यासाठी  नागपूर येथे आयोजित मोर्चात सहभागी होण्यासाठी  भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून हजारो नागरिक नागपूरला पोहोचले. जिल्ह्यातून नागपूरकडे जाणाऱ्या  ओबीसी बांधवांचे भंडारा नागपूर रोडवरील एस.आर ग्रॅड हॉटेल शहापूर  येथे खासदार सुनील मेंढे यांनी स्वागत केले. यावेळी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी  मेंढे यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला.

या ऐतिहासिक मोर्चात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते, महिला व युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. सकाळपासूनच नागपूर शहरात ओबीसींच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. मोर्चादरम्यान समाजाच्या विविध मागण्यांचे फलक, बॅनर, घोषवाक्ये आणि पारंपरिक वाद्यांचा उत्साही जल्लोष दिसून आला.

blank