24.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ गुमाधावडा शाळेला जि.प.सदस्य जगदीश बावनथडे दिली अचानक भेट

गुमाधावडा शाळेला जि.प.सदस्य जगदीश बावनथडे दिली अचानक भेट

0
28

तिरोडा:‘बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारे’ आणि मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी नेहमी ‘ॲक्शन मोड’मध्ये असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश(बालू) बावनथडे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गुमाधावडा येथे अचानक भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्तेबाबत ते किती गंभीर आहेत, हे त्यांनी कोणताही पूर्वसूचना न देता शाळेला भेट दिली.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा,शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा बारकाईने आढावा घेत सोयी-सुविधांची पाहणी केली.विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च ठेवून, शिक्षणामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि शाळेचा दर्जा जिल्ह्याच्या पातळीवर नेण्यासाठी त्यांनी शिक्षकांना निर्देश दिले.

जगदीश(बालू) बावनथडे यांच्या या ‘ऑन द स्पॉट’ समस्या निवारणाच्या कार्यपद्धतीमुळे परिसरातील नागरिकांनी आणि पालकांनी त्यांचे कौतुक केले आहे. एक ‘कार्यतत्पर’ लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श त्यांनी या भेटीतून घालून दिला आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे गुमाधावडा शाळेचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

blank