चित्रा कापसे/तिरोडा-तिरोडा नगरपरिषदेच्या येत्या निवडणुकीसाठी सर्वच राजनीतिक पार्ट्या आपापल्या पक्षातून नगराध्यक्ष बनवण्याच्या शर्यतीमध्ये लागलेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) मधून ओबीसी गटातून येणारा नवीन चेहरा म्हणून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला हेमंत (मन्नू)लिल्हारे यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.हे अत्यंत प्रभावी व सुयोग्य उमेदवार असतील अशी चर्चा सर्वत्र नागरिकांमध्ये असून हेमंत लिल्हारे हे पूर्वाश्रमी मनसेमध्ये होते. मनसेच्या राजकारणाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये डेरेदाखल झाले.यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला नवीन ओबीसी चेहरा असलेला उमेदवार मिळालेला आहे.लिल्हारे यांनी अनेक वर्षांपासून निर्विघ्नपणे सामाजिक कार्य अत्यंत मोठ्या प्रमाणात केलेले आहे.त्यांचा प्रेमळ स्वभाव सर्वच सहकाऱ्यांशी आपुलकीने वागण्याचे साधेपणा व अत्यंत साधा माणूस म्हणून जनमानसातील प्रत्येकाशी सौजन्यशीलतेने वागणारा लोकप्रिय असा व्यक्तीमत्व म्हणून शहरांमध्ये त्यांची ओळख आहे.त्यांचे अनेक कार्यकर्ते,मित्रमंडळी स्वजन व समर्थक वर्ग शहरात असून या निवडणुकीत जर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवार बनविला तर नक्कीच हेमंत लिल्हारे, भारतीय जनता पार्टीच्या घशातून नगराध्यक्ष पद खेचून आणतील यात तिळमात्र शंका नाही.शहरवासीयांनी सुद्धा हेमंत लिल्हारे यांच्याकडे नगराध्यक्षाच्या नजरेने पाहण्यास सुरुवात केली आहे.ओबीसीचा हितचिंतक नेता म्हणून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करून ओबीसींना न्याय देण्यासाठी झटत राहील व ओबीसीच्या आंदोलनात सुद्धा सक्रियपणे सहभागी होऊन ओबीसीला न्याय देण्यासाठी कार्य करेल अशी भावना ओबीसी व मागासवर्गीय समाजात सुद्धा एक सच्चा ओबीसी उमेदवार म्हणून जन माणसांमध्ये त्यांची ओळख आहे. ,ओबीसीला न्याय देण्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज एकवटून लिल्हारे यांना पाठिंबा देईल यात तिळमात्र शंका नाही.सर्व नागरिकांनी येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून ओबीसी गटातून येणारे हेमंत (मन्नू) लिल्हारे यांना नगराध्यक्षाच्या थेट निवडणुकीत आपला उमेदवार घोषित केल्यास पार्टीला मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी भूमिका स्थानिक नगरवासीयाकडून व्यक्त होत आहे.शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार हेमंत लिल्हारे असतील या नजरेने संपूर्ण जनता खासदार प्रफुल्लभाई पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी नगराध्यक्ष पदाची तिकीट लिल्हारे यांना द्यावी अशा जनतेचा मानस आहे ,*वेळ नवी , घड्याळ तेच*अशी संकल्पना जनतेमध्ये असून एका नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे व प्रस्थापित राजनीति तज्ञ यांच्या सहयोगांनी एक नवीन चेहरा नगराध्यक्ष व्हावा अशी इच्छा सर्वत्र जनतेची आहे.





