23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home राजकीय लोकनेते स्व.अजित दादा पवार यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात

लोकनेते स्व.अजित दादा पवार यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात

0
12

गोंदिया-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेता स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून खासदार प्रफुल पटेल व खासदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 22 ते 28 जुलै या दरम्यान जनसेवा सप्ताहाचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आले आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे आदरणीय स्वर्गीय अजितदादांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आदरणीय दादांच्या शिस्तप्रिय, विकासप्रेमी, लोकोपयोगी व जनसेवेच्या कार्यावर उपस्थित प्रमुख मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

आदरणीय दादांच्या विचारांनी प्रेरित ज्येष्ठ नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, देवेंद्रनाथ चौबे, प्रदेश सचिव विनोद हरिणखेडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सर्वश्री अशोक शहारे, राजलक्ष्मी तुरकर, विशाल शेंडे, शहर अध्यक्ष नानू मुदलियार, माधुरी नासरे, शिव शर्मा, केतन तुरकर, सतीश देशमुख, भगत ठकरानी, राज शुक्ला, कुंदा दोनोडे, रुचिता चव्हाण, छोटू पंचबुद्धे, राजेश दवे, आनंद ठाकूर, खालीद पठाण, लखन बहेलिया, झनकलाल ढेकवार, टी एम पटले, विष्णू शर्मा, हरिराम आसवाणी, राकेश डोडवाणी, दीपक मूलसंधानी, विनायक गजघाट, इमरान शेख, हरबक्ष गुरुनानी, हर्षवर्धन मेश्राम, शैलेश वासनिक, चंचल चौबे, आरडी अग्रवाल, सचिन अवस्थी, सुनील पटले, धरमलाल रहांगडाले, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, दिलीप डोंगरे, बिट्टू सोनपुरे, जितेंद्र येडे, श्रेयस खोब्रागडे, लव माटे, किरण कावडे, योगेश दर्वे, प्रदीप लांजेवार, अशोक चुटे, सुरेश पटले, सी एच हनवते, तुषार उके, रवी रामटेककर, संजीव बापट, टी तुरकर, योगेंद्र कुमार जैतवार, भजेंद्र तुरकर, विष्णू ढेकवार, सुरजलाल पटले, चांदोराव बिसेन, राजा जैन, गेंदलाल तुरकर, सुखनंदन तुरकर, देवेंद्र तुरकर, विजय साहू, त्रिलोक तुरकर, वामन गेडाम, चिराग बावनथडे सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank