गोरेगाव,दि.१९ःगोंदिया जिल्ह्याचे पालक सचिव तथा शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल हे जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते.दरम्यान त्यांनी गोरेगाव येथील ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथे आकस्मिक भेट देवुन कामकाजाची पाहणी केली.या भेटी दरम्यान ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथील कामकाज व निटनिटकेपणा पाहून कौतुक केले.भेटी दरम्यान ग्रामीण भागातील जनतेला गुणात्मक आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टिकोनातुन आरोग्य विभागाने अत्याधुनिक प्रयोगशाळा साहित्य व मशिनरीची उपलब्धता व नियोजन करण्याच्या सुचना दिल्या.
गोरेगाव येथील ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथे जिल्ह्याचे पालक सचिव तथा शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल यांनी आकस्मिक भेट दिली. दरम्यान उपस्थित असलेले कर्मचारीवर्ग यांच्या कामकाजाची माहीती घेतली.प्रयोगशाळेत जावुन होत असलेल्या विविध चाचणी व अत्याधुनिक मशिनरीची पाहणी केली.आरोग्य युनिट मध्ये हिवताप, क्षयरोग, एचआयव्ही,सिकलसेल तपासणी बाबतची माहीती घेवुन एलायज़ा,सीबीसी व ट्रुनेट अत्याधुनिक मशिनरीची पाहणी करून काम प्रणाली बाबत माहिती जाणून घेवुन विविध रजिष्टर व रिपोर्टची पाहणी केली.
भेटी दरम्यान त्यांचे सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार, गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,पंचायत समिती खंड विकास अधिकारी गौतम, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय पटले यांचे सह तालुका नियंत्रण पथक येथील संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.





