28 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home मराठवाडा/खान्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सोडवला अखेर कलावंतांचा प्रश्न

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सोडवला अखेर कलावंतांचा प्रश्न

0
52
दिवाळीपूर्वी दिली कलावंतांना भेट
राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजनेसाठी परभणी जिल्ह्यातील ३५ कलावंतांची निवड
परभणी, दि.19  – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना 2024-25” अंतर्गत जिल्हा परिषद, परभणी मार्फत साहित्यिक व कलावंतांची निवड प्रक्रिया खूप दिवसापासून विविध कारणामुळे रखडली होती. यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत निवड समिती यांनी एकाच दिवसात सर्व कलावंतांच्या मुलाखती, सादरीकरण प्रक्रिया घेऊन त्याच दिवशी सायंकाळी कलावंतांच्या निवडीचा निकालही घोषित केला. एक प्रकारे जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व साहित्यिक व कलावंतांना दिवाळीची भेट देऊन संवेदनशीलता दाखवल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
“राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना” अंतर्गत सन 2024-25 साठी गुरुवारी (दि. 16) जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिल्हास्तरीय निवड समितीच्या या बैठकीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने, महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती काळम,अशासकीय सदस्य म्हणून काशिनाथ उबाळे, शिवाजी सुक्ते, अनंत गोलाईत, संदीप राठोड हे सुद्धा मूल्यमापन समितीमध्ये होते.
दिवसभरात 81 कलावंताचे सादरीकरण पूर्णवेळ जिल्हाधिकारी महोदयांनी घेतले आणि त्याच दिवशी सायंकाळीच विविध क्षेत्रातील 35 कलावंतांची निवड करून यादी घोषित केली. सादरीकरणावेळी जिल्हाधिकारी महोदयांचे साहित्य व कला क्षेत्रातील प्रघाड ज्ञान पाहून अशासकीय सदस्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले.
*कागदपत्र पडताळणी व सादरीकरणानुसार निवड केलेल्या लाभार्थ्यांची यादी नाव,पत्ता, सादर केलेला प्रकार पुढीलप्रमाणे आहे.*
श्यामराव कोंडीबा नारळे, टाकळी (निलवर्ण) ता. परभणी -अभंग, मनमथप्पा नागनाथप्पा खाके, चारठाणा ता. जिंतूर- भजन, शांतीलाल छबिलदास धुमाळ, खानपूर नगर, पिंगळी रोड, परभणी-किर्तन, ढवळे महादेव शेषराव,रायपूर, हातणूर, ता. सेलू- किर्तन/कबीर, कमलाजी किशनराव कवळे, अंबाभवानी नगर -स्वच्छता गीत, विठ्ठल दौलतराव कांबळे, देवळा पुनर्वसन वाकी-बॅन्ड, सदाशिव पुंजाजी बेले गादाडगव्हाण वाडी ता. जिंतूर- वादक, दिलीप बाळिराम बनकर, वर्मा नगर -छायाचित्रकार, श्रीरंग नामदेव सोनटक्के पिंपळगाव ता. पालम जि. परभणी -गायन (भ्रूणहत्या), दैवशाला देवीदास खिलारे, गादाडगव्हाण- दारुबंदी गीत, कचरू धोंडीबा पारखे, परभणी- बॅन्ड, लक्ष्मण रंगनाथ कदम, गौतम नगर, पाथरी ता. पाथरी- भिमगीत, नागनाथ लक्ष्मणराव ब्याळे, काळगाव, ता. पुर्णा- देशभक्ती गीत, प्रकाश कोंडीबा कांबळे, शिवाजी नगर, मानवत – गायन/पेटी, बाळासाहेब देवराव कीर्तने, पंचशील नगर, परभणी- भिमगीत, विमलबाई ज्ञानोबा ढवळे, भीम नगर पाथरी ता.- भिमगीत, रखमाजी नागोराव कदम, टाकळी खु. ता. जि. परभणी-गोंधळ,मदनराव राधाकिशन कदन, जिजामाता रोड, गोंधळी गल्ली, परभणी-गोंधळ जागरण, लता ज्ञानोबा साळवे, लोकमान्य नगर-लावणी नृत्य, बाळासाहेब गंगाराम सोनवणे, बोरी -गोंधळ, शेख अजीस शेख रज्जाक, रेहमान नगर -कव्वाली संगीतकार, मुंजाजी शंकर खंदारे, सारंगपूर ता. मंगरूळ बु. ता. मानवत – एकतारी, वारू माळबाजी तळिकुटे, खाडी ता. पालम- सारंगी, रेखा विनोद कणकुटे गंगाखेड रोड, तादेश्वर नगर, परभणी-लावणी नृत्य, बाबुराव सोनाजी सातपुते, एरंडेश्वर ता. पुर्णा- गोंधळ, सुभाष विठ्ठल चव्हाण,आडगाव तांडा, आडगाव खांडगळे -वासुदेव, शिवराम यशवंत पाचंगे, पाडेगाव -गोंधळ, मोहम्मद सलिम मोहम्मद कडतोजी कुरेशी, वांगी रोड, परभणी- वादक, वर्षा यशवंतराव फड, दर्गा रोड, कुरबान अली शाह नगर, परभणी- लावणी नृत्य, शेख सुलताना शेख सलीम, इंदिरा नगर, पाथरी- हळदी/मेंहदी गीत, विठ्ठल दिगंबर गोरकट्टे, लोहा- लोक शाहीर, बाबुराव विठ्ठलराव चव्हाण, आडगाव खांडगळे ता. जिंतूर- वासुदेव, प्रल्हाद विठ्ठल चव्हाण, आडगाव खांडगळे ता. जिंतूर- वासुदेव, प्रभाकर शंकर डाहे शिवाजी नगर, मानवत- खंजेरी/दिमडी, निवृत्ती मारिबा सिरसाट, कूपटा ता. सेलू – बासरी/हलकी

blank