26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ धनत्रयोदशीला आरोग्य विभागाने धन्वंतरी मातेचे पुजन

धनत्रयोदशीला आरोग्य विभागाने धन्वंतरी मातेचे पुजन

0
73

गोंदिया,दि.२१ःदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा केला जातो.भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत.

आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती मानली जात असल्यामुळे धनत्रयोदशीला ‘धन्वंतरी जयंती’ आणि ‘आयुर्वेद दिन’ म्हणूनही साजरे केले जाते.भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते आणि चांगले आरोग्य मिळते.भगवान धन्वंतरीची पूजा आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते कारण या दिवशी ते समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाले होते.चांगले आरोग्यदीर्घायुष्य आणि रोगांपासून मुक्तीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते.धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी आणि चांगल्या आरोग्याची तसेच धन लाभाची इच्छा पूर्ण करणाऱ्या धनाची देवता कुबेर यांच्या पूजेसोबत भगवान धन्वंतरीची ही पूजा केली जाते.आरोग्य विभाग,आयुर्वेदिक दवाखाने व आयुष विभाग यांनी विविध आरोग्य संस्थेत ह्या दिवशी भगवान धन्वंतरीची पुजा करुन आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

जिल्हा के.टी.एस. सामान्य रुग्णालयातील आयुष विभागात जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिना वट्टी यांनी त्यांचे समुने हा दिवस पुजन व कार्यशाळा घेवुन साजरा केला.तर तिरोडा तालुक्यातील आयुष दवाखाना अर्जुनी येथे डॉ.शिवकुमार हरिणखेडे यांच्या संकल्पनेतुन हा दिवस साजरा केला. आमगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव येथे डॉ.भुमेश्वर पटले यांचे सह डॉ.वेदिका भोयर,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.निखील उईके,फार्मासिस्ट दलाल,आरोग्य सहाय्यक मुनेश्वर व मानकर,आरोग्य सहायिका साखरे,आरोग्य सेविका मेश्राम,पारधी,बिसेन व गौरे,आरोग्य सेवक भगत व बांबोळे तसेच आशा सेविका यांचे उपस्थितीत हा दिवस साजरा केला.गोंदिया तालुक्यातील आयुष दवाखाना धापेवाडा येथे डॉ.अमर खोब्रागडे यांचे प्रेरणेतुन हा दिवस साजरा करण्यात आला.तसेच आयुष दवाखाना शिवनी येथे डॉ.प्रेमकुमार बघेले व त्यांचे आरोग्य संस्थेतील आरोग्य कर्मचारी यांचे उपस्थितीत हा दिवस साजरा करण्यात आला.सडक अर्जुनी तालुक्यातील आयुष दवाखाना मंदिटोला येथे डॉ. अमिता नरडेले यांनी उपस्थित राहुन दिवस साजरा केला.

blank