23.9 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ ४३ गावांत कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती

४३ गावांत कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती

0
28

गोंदिया,२६ ऑक्टोबर-केंद्र शासनामार्फत फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्ट अशासकीय संस्थेच्या माध्यमातून हिवताप, डेंग्यू आदी आजारांच्या निर्मूलनासाठी विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. आरोग्य, हिवताप विभाग व फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्ट यांच्या सहकार्याने जिल्ह्यात कीटकजन्य आजार, हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती सुरू असून सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामीण भागातील ४३ गावांमध्ये एम्बेडने कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती केली. यावेळी मच्छरदाणीचा नियमित वापर, एक दिवस कोरडा दिवस पाळणे व येता कण कण तापाची-करा तपासणी रक्ताची पाबाबत जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यात देवरी, सालेकसा व अर्जुनी मोरगाव हिवतापदृष्ट्या अतिसंवेदनशील तालुके आहेत. या तीनही तालुक्यांतील ४३ गावांमध्ये कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य व हिवताप विभाग आणि फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्टच्या सहकायनि विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शिवाय आशा सेविका व महिला मंडळांची मदत घेऊन गावात जनजागर होण्याच्या दृष्टीने नागरिकांना बैठकीत बोलावून हिवताव, डेंग्यू आजार म्हणजे काय ते रोग कसे पसरतात? मच्छरदाणीचा वापर, कोरडा दिवस पाळण्याचे महत्त्व याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
हिवताप व डेंग्यू आजार डासांमुळे होत असून आजाराची लक्षणे दिसून येताच तत्काळ जवळच्या आरोग्य संस्थेत रक्त तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गडेगाव येथे फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्टच्या समन्वयक कांचन बिसेन, परसोडी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी गुरनुले, आरोग्य सेवक टेंभुर्णीकर, आशा सेविका, दुलन डोंगरे, कम्युनिटी स्वयंसेवक देवकी शहारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशी घ्या काळजी
हिवताप, डेंग्यूपासून बचावासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घरासमोर पाणी साचू देऊ नये, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवाव्या, सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्या, खिडक्यांना जाळ्या बसवाव्या, झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे, घरासमोर झाडे लावल्यानंतर नागरिकांनी त्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये, पाणी उघडे ठेवू नये असे विविध आरोग्य शिक्षण लोकांना देण्यात येत आहे.

blank