25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश परभणीत पोलीस वाहनाला अपघाता,वाहन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळले!

परभणीत पोलीस वाहनाला अपघाता,वाहन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळले!

0
25

परभणी,दि.२९ : परभणी तालुक्यातील गंगाखेड दैठणा हद्दीत महामार्गावरील बोरवंड पाटीवर मालवाहू अ‍ॅटो आणि पोलीस वाहन यांचा मंगळवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात पोलीस वाहन (Police Vehicle) रस्त्या लगतच्या खड्ड्यात कोसळले. अपघतात पोलीस निरीक्षकासह ऑटो चालक जखमी झाला आहे.

परभणी गंगाखेड महामार्गावरील बोरवंड पाटी येथे मंगळवार २८ ऑक्टोबर रोजी रोजी सकाळी साडेदहा वाजता गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोनि. श्रीकांत डोंगरे हे सरकारी वाहनाने परभणी येथे शासकीय कामानिमित्त येत होते. बोरवंड पाटीवर त्यांचे वाहन आले असता एक मालवाहतूक करणारा ऑटो परभणीच्या दिशेने जात होता. त्याच वेळी पाठीमागून पोलीस वाहन येत होते. चालकाला समोरील वाहनाचा अंदाज न आल्यामुळे समोरील मालवाहतूक करणार्‍या अ‍ॅटोला पोलीस वाहन धडकले. याच वेळी पोलीस वाहन चालकांने जोरात ब्रेक मारल्यामुळे वाहन रोडच्या खाली पलटी घेऊन पडली. यामध्ये पोनि. श्रीकांत डोंगरे हे जखमी झाले तर ऑटोचालकही किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे (Daithana Police Station) पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी व हवालदार तानाजी सिसोदे यांनी तात्काळ जखमींना खाजगी वाहनाद्वारे परभणी येथे उपचारार्थ पाठवले. या अपघात प्रकरणी दुपारपर्यंत कुठलीही नोंद झाली नव्हती.