23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home मराठवाडा/खान्देश स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

0
12

गोंडजेवली तांडा (ता. किनवट) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंडजेवली तांडा येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
यांच्या प्रथम जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष राठोड, सुरेश राठोड, बळीराम पवार, मारुती राठोड,धारासिंग राठोड, उदल राठोड, दुर्गादास आडे, विनायक राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचा व नेतृत्वाचा परिचय करून देण्यात आला.याप्रसंगी उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे यांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा, शिक्षणाप्रती असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचा व समाजहितासाठी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व शिक्षक दिलीप वाघमारे यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

blank