29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ जागर संविधानाचा भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक सोहळा

जागर संविधानाचा भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक सोहळा

0
28
वाशिम, दि. ३० ऑक्टोबर:भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत “जागर संविधानाचा” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे आयोजन महेश भवन, जुना नगरपालिका रोड, वाशिम येथे दि. ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध शाहिरा सीमा पाटील आणि संच संविधानावर आधारित संगीतमय नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी, शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी “जागर संविधानाचा” या शीर्षकाखाली संविधानावर आधारित सुमधुर संगीत सोहळा रंगणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका तनुश्री भालेराव, गायक श्रीकांत कांबळे, शाहीर संतोष खडसे तसेच संगीतकार विपुल गवई, यश कदम, विशाल इंगळे, पलाश भालेराव आणि राम देशपांडे यांसारखे सुप्रसिद्ध कलावंत सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली तसेच विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क असून, नागरिकांनी या अद्वितीय सांस्कृतिक सोहळ्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.