30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ धान खरेदी करिता पोर्टलवर ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु

धान खरेदी करिता पोर्टलवर ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु

0
608

जवळच्या तालुका पणन कार्यालयात जाऊन नावाची नोंदणी करावी

भंडारा,दि.30: किमान आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये धान  खरेदी करीता  शासनाचे BeAM पोर्टलवर ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झालेली आहे. नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.30 नोव्हेंबर, 2025 असुन सदर कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी करावयाची आहे.

तरी धान पिक उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी उपस्थित राहणेसह, चालु हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, नमुना 8 अ, अद्यावत  बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेवून तालुक्यातील जवळच्या पणन महासंघाच्या “अ’’ वर्ग व “ब’’ वर्ग सभासद संस्था असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025-26 मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी पुर्ण करावी व शासनाच्या किमान आधारभूत  किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावन कुमार जिल्हाधिकारी, भंडारा व एस. बी. चंद्रे प्र. जिल्हा पणन अधिकारी, भंडारा यांनी केलेले आहे.