चित्रा कापसे/तिरोडा,दि.३१ः- महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या मोहिमेअंतर्गत तसेच राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून आज नगर परिषद तिरोडा येथे अनुकंपा धारक पात्र असलेल्या ११ उमेदवारांना तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते गट-ड संवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद तिरोडा यांच्या वतीने करण्यात आले होते. शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांनुसार पारदर्शक आणि न्याय्य प्रक्रियेने नियुक्ती देण्यात आली असून, यामुळे पात्र उमेदवारांना नोकरीच्या माध्यमातून स्थैर्य प्राप्त झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने शुभम योगेश रावते, सुर्यकांता विठ्ठल कांबळे, हिरालाल ग्यानिराम साउसाखळे ,मुकेश झनक धारणे, योगेश गणेश ढबाले, दर्शन राजकुमार वाघमारे, प्रीती संदीप देशभ्रतार, स्वाती भारतसिंग मोहारे, सुरेखा विष्णुदास कोहळे, प्रणय राजन राऊत, अनिकेत अरविंद फुन्ने यांचा समावेश असून नगर परिषद तिरोडा येथे एकूण १५ उमेदवार अनुकंपा धारक आहेत त्यापैकी ३ अपात्र असून १ उमेदवारांचे उच्चशिक्षण असल्यामुळे त्यानी गट –ड संवर्गातील नियुकीत स्वीकारण्यास नकार दिला आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, जि.प.सदस्य पवन पटले, तहसीलदार नारायण ठाकरे, गटविकास अधिकारी श्रीमित कोल्हे, मुख्याधिकारी अमोल म्हाळकर,राजेश गुनेरीया,स्वानंद पारधी व न.प.तिरोडा येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.





