26.6 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये – आ.विनोद अग्रवाल

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये – आ.विनोद अग्रवाल

0
108

**पंचायत समिती च्या दालन्यात झालेली बैठकी मध्ये आ.विनोद अग्रवाल यांचे कडक निर्देश
गोंदिया,दि.३१ :- मागील काही दिवसापासून सातत्याने पावसामुळे शेतक-यांचे शेतपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेची अवस्थेमध्ये असून दुखा:चा डोंगर त्यांच्यावर पडला आहे. दिवसरात्र शेतपिकाची लागवड झाल्यापासून जोपर्यंत पीक बाजारापर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकरी मेहनत करीत असतो परंतु वातावरण व प्रकृतिमुळे शेतक-यांच्या धानपिकाला मोठे नुकसान सहन करावे लागत असतो. सगळीकड़े या पावसाने नुकसान झाले आहे व आ.विनोद अग्रवाल यांनी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात वरिष्ठ अधिकारीसह दौरा केले असुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते परंतु काही गावातील नागरिक व शेतकरी यांच्याद्वारे तक्रारी आ.विनोद अग्रवाल यांच्याकड़े प्राप्त झाले कि ग्राम पंचायत अधिकारी तसेच तलाठीयांच्या सहकार्य होत नाही आहे त्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात यामुळे तातडीने आ.विनोद अग्रवाल यांनी पंचायत समितीच्या दालन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित बैठकीमध्ये सर्व गावातील ग्राम पंचायत अधिकारी, कृषि सहाय्यक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

आयोजित बैठकीमध्ये आ.विनोद अग्रवाल यांनी सर्व ग्राम पंचायत अधिकारी यांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहू नये या दृष्टीने कार्य करावे असेही सांगितले तसेच माझ्याकड़े गाँव नाही, मला नाही माहित अश्या प्रकारे शेतक-यांना जवाब देऊ नका सर्वाना लाभ मिळाला पाहिजे याची दक्षता घ्यावी. तसेच ई -पीक पाहणी करीता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्यापासून ही एकही शेतकरी वंचित राहू नये कारण ई-पीक ची मुदतवाढ करण्यास अडचणी निर्माण होतात तसेच बोनस, धान विक्री पासून शेतकरी वंचित राहू शकतात व आचारसंहितापूर्वी पट्टे वाटपाची कार्यवाही करावी असेही निर्देश आ.विनोद अग्रवाल यांनी दिले.

पंचायत समीति च्या बैठकीमध्ये सभापती मुनेश रहांगडाले, तहसीलदार समशेर पठान, खंड विकास अधिकारी मडामे, तालुका कृषि अधिकारी नेहा आढ़व, कनीराम तावाड़े सदस्य पंचायत समिती, मनीषसिंह गहरवार सरपंच जब्बारटोला तसेच पंचायत समीती येथील अधिकारी या दरम्यान उपस्थित होते त्यांनी सुद्धा सर्वांच्या नुकसानीची भरपाई मिळावी व एकही लाभार्थी वंचित राहू नये या जवाबदारीने कार्य करावे असे निर्देश दिले. या बैठकीमध्ये सर्व ग्राम पंचायत अधिकारी व इतर कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.