
तिरोडा,दि.9 नोव्हेंबर – येथील आयुष्मान आरोग्यमंदीर पांजरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत हिमोग्लोबीन तपासणी,समुपदेशन व आयुष्मान कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात विविध गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावपातळीवर लोकांना विविध योजना चा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातुन शिबीर आयोजीत केली जात आहे.दि.1 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्या वतिने गावातील 0 ते 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली तसेच महिलाची हिमोग्लोबीन तपासणी तसेच आयुष्मान कार्ड बाबत ईकेवायसी करण्यात आल्याची माहीती तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी यांनी दिली आहे.
हिमोग्लोबीन तपासणी शिबीरा दरम्यान आरोग्य सेविका रिता कोल्हटकर,समुदाय आरोग्य अधिकारी नेहा सुर्यवंशी यांनी रक्त तपासणी केली. आशा सेविका मिनाक्षी रहांगडाले यांनी लोकांना रक्त चाचणी करण्यासाठी प्रवृत्त केले तर आरोग्य सेवक अनमोल चव्हाण यांनी रक्तामधील लोह व आयर्न याबाबतचे महत्व विषयी तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजने विषयी माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमामध्ये सरपंच शारदा ताई चामट, ग्राम सेवक दत्ता हडबे, माजी सरपंच राजेंद्रजी चामट,समुदाय आरोग्य अधिकारी नेहा सुर्यवंशी,आरोग्य सेवक अनमोल चव्हाण, आरोग्य सेविका रिता कोल्हटकर,आशा सेविका मीनाक्षी रहांगडाले, आरोग्य मदतनीस सुशीला रहांगडाले उपस्थित राहुन तपासणी व मार्गदर्शन केले.





