
नामकरण कृती समितीची मागणी.
अर्जुनी-मोर. दि.१४. येथील सुप्रसिद्ध जलाशयाला स्वर्गीय माधवराव पाटील डोंगरवार यांचे नाव तर येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासी रिसॉर्टला भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार दयाराम कापगते यांचे नाव देण्याची मागणी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नामकरण कृती समितीने केली आहे.
नवेगावबांध जलाशयाला मालगुजार सीताराम पाटील डोंगरवार यांच्या कार्यकाळापासून तर आता पर्यंत अभयारण्य निर्मिती करिता सिताराम पाटील डोंगरवार यांचे पुत्र माधवराव पाटील डॉगरवार यांचे या तलावाला निर्मिती संवर्धन करिता मोठे योगदान आहे.१९७५ सालापासून हे अभयारण्य निर्मितीत सुद्धा श्री माधवराव पाटील डोंगरवार यांची भूमिका महत्त्वाची असून,या तलावाचे पाणी तलाव खालील भागात येणाऱ्या पाच गावांना पाणीसुद्ध देण्यात माधवराव पाटील यांची भूमिका तसेच तलावाच्या पाण्यावर मासेमारी,पशु पक्षांना राहण्याकरिता वास्तव्य स्थान विषय त्यांचे कार्य मोठे आहे.त्यांचे निवास स्थान सुद्धा या नवेगावबांध परिसरात असल्याने या नवेगावबांध जलाशयाला नवेगावबांध नाव कायम ठेवून माधवराव पाटील डोंगरवार नवेगावबांध जलाशय हे नाव देण्यात यावे.
तसेच येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासी संकुल परिसराला भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय दयारामभाऊ कापगते यांचे नाव देण्याची मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या परिसराचे व नवेगावबांध गावचे पहिले आमदार असून स्वर्गीय दयारामभाऊ कापगते यांचे या तलावाच्या संवर्धन या तलावाच्या पाण्याचे व जमिनीचे वनांचे संवर्धन करण्याकरिता पर्यटन क्षेत्राला वाव देण्याकरिता आमदार असताना अनेक महत्त्वाचे कामे स्वर्गीय दयारामभाऊ कापगते यांनी केले आहे. लोकांना मालगुजारी तलाव व त्यांचे हक्क यासंबंधी परिसरात जाणीव जागृती करून दिलेली आहे. त्यामुळे नवेगाव बांध जलाशय परिसरात नव्याने निर्माण झालेल्या महामंडळाच्या पर्यटक निवासी रिसॉर्टला स्वर्गीय माजी आमदार दयाराम कापगते यांचे नाव देण्यात यावे.अशी मागणी यावेळी करण्यात आली.प्रास्ताविकातुन डाॅ.गजानन डोंगरवार यांनी पत्रकार परिषद घेण्यामागची भुमिका विशद केली.संचालन लक्ष्मीकांत धानगाये यांनी तर उपस्थितांचे आभार होमराज पुस्तोळे यांनी मानले.
या पत्रकार परिषदेत आयोजक डॉ. गजानन डोंगरवार यांच्यासह,विजयाताई कापगते, चामेश्वर गहाणे,सरपंच हिराताई पंधरे, अण्णा पाटील डोंगरवार,मूलचंद गुप्ता, होमराज पुस्तोडे, गिरिधर हत्तीमारे, खेमराज भेंडारकर, जयंत लांजेवार, महादेव बोरकर,कृती समितीचे प्रवक्ते लक्ष्मीकांत धानगाये,खुशाल कापगते, शारदाताई नाकाडे,श्रीधर डोंगरवार, धनंजय डोंगरवार उपस्थित होते.





