38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस उत्साहात

आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस उत्साहात

0
60

blank

गोरेगाव – भगवान बिरसा मुंडा एक महाण आदिवासी नेते आणि लोकनायक होते इंग्रजांसी संघर्ष करून त्यानी आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण केले आज १५ नोव्हेंबर जयंती साजरी करित आहोत असे प्रतिपादन मोहाडी ग्रांमपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले .झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी आदिवासी कुंटंबात झाला आदिवासी समाजासाठी मोठा संघर्ष केला असे महान भगवान बिरसा मुंडा याची आज १५० वी जयंती आहे. त्याच्या स्मरणार्थ रांची येथील मध्यवर्ती कारागृह व विमानतळाला बिरसा मुंडा म्हणून नाव देण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष जे जे पटले गुरूजी सदस्य प्रमानंद तिरेले, कमलेश पटले, सेवानिवृत्त शिक्षक आर एफ पारधी, सदस्य वाय एफ पटले, सचिव सुभाष चौरागडे,डि आर चौरागडे, चंन्द्रकुमार चौरागडे ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निशांत बिसेन,आशा चेचाने यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर वाचक गावकरी उपस्थित होते.

blank