31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ बाबासाहेबांचे मानवतावादी विचार सर्वांसाठी दीपस्तंभ:- आम.राजकुमार बडोले

बाबासाहेबांचे मानवतावादी विचार सर्वांसाठी दीपस्तंभ:- आम.राजकुमार बडोले

0
30

blank

अर्जुनी-मोर.-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले.अनु.जाती,जमाती,ओबीसी वर्ग व तमाम बहुजन मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी संविधानात विशेष तरतुद केली.आज प्रत्येक भारतिय सन्मानाने जगत आहे.ते केवळ संविधानामुळेच.त्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी विचार सामाजीक न्यायाची शिकवण आणी संविधानीक मुल्ये आजही सर्वांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत.असे प्रतिपादन अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी केले.
भिमघाट स्मारक समिती गोंदिया येथे आयोजित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी आमदार बडोले बोलत होते.अभिवादन कार्यक्रमाला माजी नगरसेवक घनश्याम पानतवने, माजी सभापती विश्वजीत डोंगरे,गौतम साखरे,भिमघाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे, धनंजय वैद्य, अजीत मेश्राम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम भिमघाट येथील स्मारकात आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी भगवान बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्रिवार वंदन केले.व भारताच्या संविधान निर्मात्या महामानवाला विनम्र अभिवादन केले.तसेच बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण ठेवत समाजासाठी केलेल्या योगदानाचे महत्व या अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून अधोरेखीत केले.भिमघाट येथे हजारोंच्या संख्येनी बौध्द उपासक,उपासिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.

blank