23 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home राष्ट्रीय देश इन्फोसिस आयटी कंपनीची प्लेसमेंट थांबणार, इंजिनिअरिंगच्या मूलांना फटका बसणार

इन्फोसिस आयटी कंपनीची प्लेसमेंट थांबणार, इंजिनिअरिंगच्या मूलांना फटका बसणार

0
78
बेंगलोर/वृत्तसेवा- देशातील इन्फोसिस या आयटी कंपनीची प्लेसमेंट थांबणार आहे, तर देशभरातील इंजिनिअरिंगच्या मूलांचे मोठे नुकसान होणार आहे. या वर्षी शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या इन्फोसिस या आयटी कंपनीने एक महत्त्वाची घोषणा करत इंजिनियर मूलांना मोठा धक्का दिला आहे. देशातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सर्वात मोठ्या इन्फोसिस या आयटी कंपनीची प्लेसमेंट थांबविण्याची भूमिका मांडली आहे. कॅम्पस प्लेसमेंट थांबल्यामूळे देशातील इंजिनियर झालेल्या फेशर्सला झटका देणारा मोठा निर्णय या आयटी कंपनीने घेतला आहे.
इन्फोसिस या आयटी कंपनीच्या निर्णयामूळे देशातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना नोकरीला फटका बसणार आहे. देशातील आयटी क्षेत्रातील नोकरी करणारे यांचे टेन्शन वाढले आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत दुसऱया स्थानी असलेल्या इन्फोसिस या आयटी कंपनीने आता थेट कॅम्पसमधून मुलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून लागणाऱया नोकऱयांची संख्या कमी होणार आहे. इन्फोसिस या आयटी कंपनीने असा निर्णय घेतला आहे, याचा देशातील आयटी क्षेत्रातील नोकरीवर मोठा परिणाम होणार आहे.
इन्फोसिस या आयटी कंपनीच्या निर्णयामुळे इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. देशातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील भारतातील दुसऱया क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिस लिमिटेडने येत्या काही वर्षांत कॉलेजमधून थेट पदवीधर होणाऱयांना विद्यार्थ्यांची भरती कमी करणार आहे. या निर्णयाचा फटका अभियांत्रिकी म्हणजेच देशभरातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या निर्णयामुळे देशातील इंजिनिअरिंग करणाऱया विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. ऑटोमेशनमुळे एन्ट्री लेव्हलच्या नोकरीची संधी कमी होत असून आता हा ट्रेण्ड लवकरच देशभरातील इतर क्षेत्रांमध्ये दिसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
देशातील “इन्फोसिस ही आयटी कंपनी भविष्यात कमी कमी फ्रेशर्सना कामावर ठेवणार आहे. उच्च उत्पादकतेमुळे सक्षम कर्माचाऱयांना प्राधान्य असेल. 16 डिसेंबर 2025 रोजी फर्मच्या व्यवस्थापनाशी झालेल्या संवादाचा हवाला देत ही माहिती देण्यात आली आहे. देशातील “इन्फोसिस ही आयटी कंपनी प्रति व्यक्ती महसूल वाढण्याच्या प्रयत्नात आहे,“ असेही या रिसर्च फर्मने म्हटले आहे. “कर्मचाऱयांची उत्पादकता वाढल्याने पुढील काही वर्षांत मॅनेजमेंटला अपेक्षा आहे की, कर्मचारी उत्पादकता वाढून मॅनेजमेंटमध्ये माफक प्रमाणात वाढ होईल,“ असा उल्लेख करण्यात आला आहे.
देशातील आयटी क्षेत्रात येत्या काळात मंदी येऊ शकते. बंगळुरूमधील इन्फोसिस ही आयटी क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे ज्यांनी एन्ट्री लेव्हल नोकऱयांमध्ये घट होणार असल्याचा स्पष्ट अंदाज व्यक्त केला आहे. इन्फोसिसने गेल्या आर्थिक वर्षात कॉलेजमधून बाहेर पडल्या पडल्या नोकरी शोधणाऱ्या 15 हजार फ्रेशर्सला नोकरी दिली आहे. मॅक्रो-इकॉनॉमिक अनिश्चिततेमुळे क्लायंट खर्चात कपात करण्याचा दबाव आणि अमेरिकेतील व्हिसा निर्बंधांमुळे आयटी क्षेत्र मंदीचा सामना करत आहे.
यावर्षी पास होणाऱया विद्यार्थ्यांना नोकऱयांची संधी मिळणार नाही. तर गेल्या दोन वर्षांत नवीन विद्यार्थ्यांची भरती मंदावली आहे, देशातील हजारो अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून पदवीधर झालेल्या सुमारे 1.3 लाख विद्यार्थ्यांसाठी हा धक्का आहे. भारतातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना 2026 च्या बॅचसाठी आयटी आउटसोर्सर्स कमी फ्रेशर्सना नोकरी देतील अशी अपेक्षा आहे. इन्फोसिसचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2025 मध्ये वर्षानुवर्षे 3.85 टक्के वाढून 19.28 अब्ज डॉलर्स झाले आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारतातील आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीमधील कर्मचाऱ्यांची संख्या 6 लाख 14 हजारांपर्यंत असून त्याखालोखाल इन्फोसिसचा क्रमांक लागतो. नारायण मूर्तींच्या या कंपनीमध्ये 3 लाख 23 हजार जण नोकरी करतात. त्यानंतर तिसऱया क्रमांकावर 2 लाख 26 हजार कर्मचाऱयांसहीत ’एचसीएल टेक’चा क्रमांक लागतो तर चौथ्या स्थानी 2.30 लाख कर्मचारी असलेली ’विप्रो’ कंपनी आहे. जगभरातही काही मोठया आयटी कंपन्यामध्ये मोठी कपात सुरू आहे.

blank